Gokul Zirwal on Elections : बापाला पाडण्यासाठी लेक मैदानात, गोकूळ झिरवाळ निवडणूक लढणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGokul Zirwal on Elections : बापाला पाडण्यासाठी लेक मैदानात, गोकूळ झिरवाळ निवडणूक लढणार?
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) यशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने कंबर कसली आहे. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. जयंत पाटील यांच्या नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) यांनी हजेरी लावल्याने एकाच खळबळ उडाली.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकूण सहा आमदार आहेत. यात येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, देवळालीतून सरोज अहिरे, निफाडमधून दिलीप बनकर, कळवणमधून नितीन पवार यांचा समावेश आहे. अजित पवारांच्या आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून चाचपणी केली जात असल्याचे समजते. नाशिकच्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आज जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत.