'गोकुळ'कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, म्हशीच्या दुधाला 2 रुपये, गायीच्या दुधाला 1 रुपये दरवाढ

Continues below advertisement

कोल्हापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने मोठा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत 25 वर्षांनी सत्तांतर झाल्यावर आज झालेल्या बैठकीत गोकुळ दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. खरेदीत दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विक्री दरातही वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांना मात्र नाराज केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram