पुण्यात 10 रुपयात बसने गारेगार प्रवास, PMPML पुण्यदशम योजनेचा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ
अवघ्या 10 रुपयांत दिवसभर प्रवास, तोही संपूर्ण शहरात आणि खास एसी बसमधून! पुणे महापालिकेच्या या उपक्रमाचं आज 9 जुलैला उदघाटन झालं आहे. या विशेष बससेवेला पुण्यदशम असं नाव देण्यात आलंय. अशा एकूण 50 बसेस पुण्यात धावणार आहेत, शहरातील सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात येत आहे.