Godavari नदीच्या काठावर हजारो दिवे प्रज्वलित, रिव्हर्स ऑफ इंडिया अंतर्गत उपक्रमाचा समारोप Nanded
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत रिव्हर्स ऑफ इंडिया उपक्रमांत नांदेड इथल्या गोदावरी आणि आसना नदीच्या संगमाचा समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने त्रिकुट संगमाच्या काठावर गेली आठ दिवस स्वच्छतेसह लोकसहभागातून अनेक उपक्रम सुरु आहेत. काल सायंकाळी या उपक्रमांची सांगता संगमाच्या पात्रात सांजवातीने करण्यात आली. महिलांनी पारंपारीक गीतं गावून नदिची पूजा केली. या पुढे नदीला प्रदुषीत न करण्याचा संकल्प करत सांजवातेसह दिव्यांना प्रज्वलीत करून संगमाच्या पाण्यात प्रवाही करण्यात आलं. यामध्ये पंचक्रोशीतले हजारो नागरीक सहभागी झाले होते.