Goa Hostage Drama: 'जी Story सांगितली, तीच त्याने प्रत्यक्षात केली'; अभिनेत्री Ruchita Jadhav चा धक्कादायक खुलासा
Continues below advertisement
गोवा अपहरण प्रकरणातील (Goa Kidnapping Case) आरोपी रोहित आर्याने (Rohit Arya) अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav), गिरीश ओक (Girish Oak) आणि उर्मिला कोठारे (Urmila Kothare) यांच्यासह अनेक कलाकारांना चित्रपटाच्या नावाखाली संपर्क साधल्याचे समोर आले आहे. 'जी स्टोरी त्यांनी सांगितली होती, तीच त्यांनी प्रत्यक्षात केली', अशी धक्कादायक प्रतिक्रिया अभिनेत्री रुचिता जाधव यांनी दिली आहे. आरोपी रोहित आर्याने 'A Wednesday' चित्रपटावरून प्रेरित पटकथा रुचिता यांना ऐकवली होती. यामध्ये एका सामान्य माणसाची भूमिका होती जो व्यवस्थेविरोधात मुलांना ओलिस ठेवतो. या चित्रपटाच्या चर्चेसाठी २८ ऑक्टोबर रोजी भेटण्याचे ठरले होते, परंतु सासऱ्यांच्या आजारपणामुळे रुचिता यांनी ही भेट रद्द केली. घडलेला प्रकार बातम्यांमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. आपण न गेल्याने देवाचे आभार मानले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement