Asaduddin Owaisi : मुस्लिमांनाही शिकायचंय त्यांना आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOwaisi in Mumbai : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुस्लिम मुलांनाही शिकायचं आहे, त्यांनाही आरक्षण द्या, असं म्हणत मुंबईच्या चांदिवलीत एमआयएमची सभा पार पडली. तर सेक्युलिरझम या शब्दामुळे मुस्लिम समाजाचं नुकसान झालं असाही घणाघात केला.
मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये : असदुद्दीन ओवेसी
मुस्लिम आरक्षणावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने भाषणे दिली. परंतु आरक्षण कुठे आहे? कधीपर्यंत तुम्ही अशीच फसवणूक करून घेणार आहे. शरद पवार, राहुल गांधी यांनी शिवसेना किती धर्मनिरपेक्ष आहे हे सांगावे. तुम्ही सन 1992 मध्ये काय झाले हे विसरलेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की, बाबरी मशिद आम्ही पाडली आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीला काही वाटले नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुस्लिमांनी आता यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या मतांचा त्यांनी योग्य वापर करावा असेही ओवेसी यांनी म्हटले.