GitHub Muslim Woman: 'गिटहब' वर मुस्लिम महिलांचे फोटे अपलोड, आक्षेपार्ह मजकूर ABP Majha
वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर आणि सुल्लीडील सारख्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करून, आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर आपलं परखड मत मांडणाऱ्या मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आल्याचं समजतंय. दिल्लीतील एका महिला पत्रकारानं या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडलीय. या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास सुरु केलाय. दरम्यान या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी दखल घेण्यास उशीर केल्याचा आरोप प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय.