Dawood Ibrahim :दाऊदच्या नातलगाच्या लग्नात Girish Mahajan विरोधकांचा आरोप,देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDawood Ibrahim :दाऊदच्या नातलगाच्या लग्नात Girish Mahajan विरोधकांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. गिरीश महाजन हे दाऊदच्या एका नातेवाईकाच्या लग्नात उपस्थित होते. असा आरोप विरोधी पक्षाने केलाय. हे आरोप करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक फोटोही पत्रकारांना दाखवलाय. दरम्यान, ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते त्या धर्मगुरु शहर-ए-खतीब यांचा दाऊदशी संबंध नाही, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तसेच, गिरीश महाजनांवर आरोप करताना खातरजमा करणं आवश्यक असल्याचंही फडणवीस म्हणालेत. त्यानंतर, स्वत: गिरीश महाजन यांनीही आपली बाजू मांडलीय. विरोधकांनी आपल्यावर खोटे आरोप केले असून, त्या लग्नाला २० ते २५ नेते उपस्थित होते. त्याचसोबत, मुलीकडच्यांचे दूरचे नातेवाईक दाऊदच्या जवळचे आहेत, त्यांचा दाऊदशी कोणताही संबंध नसल्याचं महाजनांनी म्हटलंय.
Dawood Ibrahim Updates : फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. दाऊदच्या प्रकृती बाबत चर्चा सुरू झाल्यानंतर मुंबई पोलिसांनीदेखील (Mumbai Police) आपली सूत्रे हलवली. मुंबई पोलिसांना दाऊदच्या प्रकृतीबाबत (Dawood Ibrahim Health Updates) मोठी अपडेट मिळाली आहे. दाऊद इब्राहिमला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. मात्र, दाऊद इब्राहिमला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.