Girish Mahajan : जरांगेंना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळणारच-गिरीश महाजन
Girish Mahajan : जरांगेंना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही, क्युरेटीव्ह पिटीशनमध्ये सरकार भक्कमपणे बाजू मांडणार - गिरीश महाजन .. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनीही पलटवार केला आहे. ते म्हणाले की, आज जाहीर सभा झाली. सभेमधील अर्धे भाषण भुजबळांवरच होते. माझं नाव नाही घेतलं, मग भाषण करणार तरी काय? बाकी लेकरं बाळं असं नेहमीचं होतं. त्यांनी काल चर्चा करताना त्यांनी सगेसोयरेंचा मुद्दा घेतलाच नाही. त्यामुळे स्मरणशक्तीमध्ये गडबड असल्याचे दिसते. सर्व काही भुजबळांनी जाळलं म्हणतात, मराठ्यांना तुम्ही डाग लावला म्हणता, मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका, वाट्याला गेलात तर काय होतं ते लक्षात ठेवा असं म्हणतात, तर मग बीडमध्ये जे काही घडलं ती जाळपोळ केल्याची अप्रत्यक्ष कबूली आहे का? अशी विचारणा केली.
छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही
जास्त घेतल्यामुळे विसरल्यासारखं होत असेल, ते एकतर हॉस्पिटलमध्ये राहतात नाहीत, तर बाहेर राहतात. 12 इंच छाती आहे, ठोकून ठोकून उगाच जास्तीचं काही होईल. कोणी आरे म्हटले तर कारे कोणीतरी करणार आहे. छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही, असा टोला त्यांनी लगावला.