Girish Mahajan Fitness : गिरीश महाजन यांचा फिटनेस फंडा, दररोज एक हजार दोरीवरच्या उड्या : ABP Majha

Continues below advertisement

गिरीश महाजन  हे त्यांच्या फिटनेस बाबत नेहमीच विविध तर्क वितर्क लावले जात असतात,अशातच एका व्यायाम शाळेची पाहणी करताना कार्यकर्त्यांनी त्यांना दोरीवर उड्या मारून दाखवायचा आग्रह केला असता महाजन यांनी पाचशे उड्या मारून दाखवत आपल्या फिटनेसचा प्रत्यय दिल्याने उपस्थित कार्यकर्तेही अवाक झाल्याचं पाहायला मिळाले आहे.
भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे त्यांच्या शारीरिक फिंटनेस बाबत नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे,राजकीय जीवनात कितीही दगदग असली तरी त्यातून वेळात वेळ काढून गिरीश महाजन हे आपला नियमित व्यायाम करतात,व्यायामाच्या विविध प्रकारात गिरीश महाजन हे रोज एक हजार दोरीवर उड्या मारून आपला फिटनेस जपण्याचा प्रयत्न करत असतात, काल जामनेर शहरातील गीताई व्यायाम शाळेच्या पाहणीसाठी कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला होता, या वेळी गिरीश महाजन यांनी आपल्या फिटनेस बाबतची अनेक रहस्यं उपस्थित कार्यकर्त्याना सांगितली होती यातील एक म्हणजे रोज दोरी वर उड्या मारण्याचा त्यांनी सांगितलं होत.यावेळी कार्यकर्त्यांनी दोरीवर उड्या कशा मारता येतात याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची विनंती गिरीश महाजन यांना केली होती. महाजन यांनीही तात्काळ कार्यकर्त्यांनच्या विनंतीला मान देत  दोरीवरच्या पाचशे उड्या मारुंन दाखवल्याने उपस्थित कार्यकर्तेही पाहताच राहिल्याचं बघायला मिळाले आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram