Girgaon Exhibition History : शिवकालीन शस्त्र, किल्ले आणि नाणी; गिरगावात अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन

Continues below advertisement

'गिरगाव प्रबोधन' आयोजित किल्ले बांधणी स्पर्धा, शिवकालीन शस्त्र आणि नाणी प्रदर्शनाचं आयोजन गिरगावात करण्यात आलं होतं. गिरगावच्या शारदा सदन शाळेत या दोन दिवसीय प्रदर्शनाची काल सांगता झाली. या उपक्रमाचं हे सहावं वर्ष होतं. किल्ले प्रदर्शनात प्रतापगड, नळदुर्ग, रायगड, वाळूने साकारलेला विजयदुर्ग आदी गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आली. याशिवाय तलवार, भाले, ढाल, खंजीर आदी शस्त्र तसंच जुन्या नाण्यांचा संग्रहदेखील यावेळी प्रदर्शनात पाहायला मिळाला. या प्रदर्शनाला परिसरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram