Ghanshyam Shelar Ahmednagar : घनश्याम शेलारांचा बीआरएसला रामराम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGhanshyam Shelar Ahmednagar : घनश्याम शेलारांचा बीआरएसला रामराम अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे...बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला... बीआरएस पक्षात जाण्याआधी शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते...त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद देखील भूषवले आहे...गेल्या विधानसभेला अतिशय कमी मताने घनश्याम शेलार यांचा पराभव झाला होता...श्रीगोंदा तालुक्यात घनश्याम शेलार यांचा जनसंपर्क आणि ताकद आहे...शेलार यांनी ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने नगर दक्षिणचे माविआचे उमेदवार निलेश लंके यांना मोठा फायदा होणार आहे...शेलार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर श्रीगोंदा तालुक्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची राजकीय समीकरण देखील बदलणार आहेत.