Gerbera flower Plantation | दुष्काळी भागात जरबेरा फुलांची लागवड; महिन्याला एक लाखांचे उत्पन्न
शेती करतांना बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जर शेतात पीक घेतले तर निश्चितच त्याचा फायदा होतो. फुलशेतीच्या बाबतीत तर हे सूत्र अगदी तंतोतंत लागू पडतं. आष्टी तालुक्यातील नांदूर येथील दत्तात्रय विधाते यांनी जरबेरा या फुलांची शेती करून युवकांना प्रेरणादायी ठरेल अशी हरितगृहामधील शेती करत लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे.