Gokul दूध संघाची आज सर्वसाधारण सभा, सत्तातरानंतर पहिलीच पण ऑनलाईन सभा, सभेआधीच संचालिकांचा विरोध
Continues below advertisement
Kolhapur : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार आहे. गोकुळ मधील सत्तांतरानंतर होणारी ही पहिलीच सर्वसाधारण सभा आहे. मात्र ही सभा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या सभेत मुंबई आणि परिसरात जागा खरेदीसाठीच्या 328 कोटींच्या खर्चाला मंजुरीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. या प्रस्तावाला संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध केलाय. इतक्या महत्त्वाचा प्रस्ताव सभासदांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत घ्यावा अशी मागणी त्यांनी केलीय.
Continues below advertisement