नांदेडमध्ये जिलेटिनची वाहतूक करणाऱ्या गाडीचा स्फोट, जमिनीला 20 फूट खड्डा पडला, स्फोटात चालक जखमी
मुदखेड तालुक्यातील पंढरवाडी रस्त्यावर जिलेटीन वाहून नेणाऱ्या गाडीचा अपघात होऊन स्फोट झाल्याची भीषण दुर्घटना घडलीय. पंढरवाडी ते मुदखेड प्रवासा दरम्यान सदर गाडीचे चाक निघून अपघात घाडला व गाडीला आग लागली.परंतु परिसरातील नागरिकांच्या समय सुचकतेमुळे लोक अपघाताच्या ठिकाणी धावून गेले व अपघात ग्रस्त गाडीतून ड्रायव्हर ला बाहेर काढले.गाडीत जिलेटीन स्फोटकाची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या वाहनांची वाहतूक थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.