Gautami Patil : गौतमी पाटीलसाठी आता आयोजकांच्या खिशाला लागणार कात्री
abp majha web team
Updated at:
20 May 2023 09:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसबसे कातिल गौतमी पाटील अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलला अजूनही राज्यभरातून अफाट मागणी आहे.. मात्र आता तिचा कार्यक्रम आयोजकांना जवळपास चौपट महागात पडणार आहे त्यामुळे याचा फटका आयोजकांसह गौतमी आणि तिच्या चाहत्यांना देखील बसण्याची शक्यता आहे . गौतमीचा कार्यक्रम आणि चाहत्यांची हुल्लडबाजी हे जणू समीकरणच झाले आहे . यात कधी प्रेक्षकात हाणामारी होते तर कधी पोलिसांना या हुल्लडबाजांवर काठ्या चालवावा लागतात . अशातच परवा या हुल्लडबाजांचा फटका माध्यमांच्या कॅमेरामॅनलाही सोसावा लागला . यामुळेच आता पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमांना सर्व परवानग्या सोबत पेड पोलीस बंदोबस्त देण्यास सुरुवात केली आहे आणि याच पेड बंदोबस्तामुळे आयोजकांच्या खिशाला जवळपास चौपट कात्री लागणार आहे.