Gautam Adani : 'बंधनं झुगारली तरच प्रगतीची संधी', उद्योगपती गौतम अदानींनी सांगितला यशाचा मंत्र

Continues below advertisement

Gautam Adani : 'बंधनं झुगारली तरच प्रगतीची संधी', उद्योगपती गौतम अदानींनी सांगितला यशाचा मंत्र
आयुष्यात बंधनं झुगारण्याची हिंमत दाखवणारी व्यक्तीच प्रगती करू शकते, असं प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी केलं आहे. मुंबईतल्या जयहिंद कॉलेजमध्ये शिक्षकदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना त्यांनी आपल्या अनुभवांची शिदोरी विद्यार्थ्यांसोबत शेअर केली. आपण अवघ्या १६ वर्षांचा असताना पहिल्यांदा बंधन झुगारून दिलं, असं अदानी यांनी सांगितलं. वयाच्या सोळाव्या वर्षी मी अहमदाबाद सोडून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आणि त्याच निर्णयानं माझ्या आयुष्याला कलाटणी दिली असंही त्यांनी सांगितलं. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा उल्लेख होत असलेल्या धारावीचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी अदानी समूहाला देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी यांनी धारावी म्हणजे आपल्यासाठी केवळ नागरी विकास नसून, १० लाख नागरिकांची प्रतिष्ठा पुनर्प्रस्थापित करून देण्याची जबाबदारी आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram