Gateway Of India : बोटीतील प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य, बोट दुर्घटनेनंतर विशेष काळजी

Continues below advertisement

Gateway Of India : बोटीतील प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य, बोट दुर्घटनेनंतर विशेष काळजी

 गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची (Mumbai Neelkamal Boat Accident) घटना मुंबईत घडली. या बोटीत सुमारे 80  प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे.   एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट बुडाल्याची माहिती आहे.   स्पीड बोटेने राऊंड मारला आणि समोरून धडक दिली या अपघाताची दृश्य ही कॅमेरात कैद झाली आहेत. त्यामध्ये एक स्पीड बोट ही आधी मोठा राऊंड मारताना दिसत आहे. नतंर ही स्पीड बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक मारते. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. धडक मारणारी ही स्पीड बोट इंडियन नेव्हीची असल्याचं सांगितलं जातंय. ही बोट नेव्हीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडियन नेव्हीकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे.   बचावकार्य पूर्ण घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं असून 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून घटनास्थळ जे समुद्रात जवळपास 10 किमी अंतरावर आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram