Gatari Amavasya 2021: गटारी निमित्त NonVeg Partyचा बेत, पण Weekend Lockdownमुळे मद्यप्रेमींची निराशा
उद्यापासून श्रावण सुरु होतो आहे... आणि आज गटारीनिमित्त मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळतेय. चांद्यापासून बांद्यापर्यंत गटारीनिमित्त अनेकांनी नॉन-व्हेज पार्टीचा बेत आखलाय.. कुणी माश्यांवर ताव मारणार आहे.. तर कुणी बिर्याणीवर. मात्र यंदा काही शहरात कोरोनामुळं मद्यप्रेमींची निराशा होणार असल्याचं दिसतंय. कारण कारण विकेन्ड लॉकडाऊनमुळं वाईन शॉप बंद आहेत...