Ralbaugcha raja Visarjan Delayed | बाप्पाच्या विसर्जनाला उशीर, अत्याधुनिक Raft चा वापर!

Continues below advertisement
गणपती बाप्पाचे विसर्जन समुद्रात चार ते पाच किलोमीटर आत होणार आहे. यंदा अ-यांत्रिक दृष्ट्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा तराफा वापरण्यात आला आहे. या तराफ्यात वेगळ्या पद्धतीची Technology वापरली आहे, ज्यामुळे मूर्ती आपोआपच समुद्रात विसर्जित होईल आणि मनुष्यबळाची गरज लागणार नाही. सकाळी आठ-साडेआठ वाजता अपेक्षित असलेले विसर्जन समुद्राला आलेल्या High Tide मुळे लांबले. सकाळी आठ नंतर समुद्रात पाणी भरण्यास सुरुवात झाली आणि Trolley व Raft यांच्यातील अंतर राखणे कठीण झाले. त्यामुळे विसर्जन रात्री साडेआठ वाजता झाले. ही पहिली वेळ अशी आहे की बाप्पाचे विसर्जन इथे उशिरा होतेय. अन्यथा दरवर्षी सकाळीच विसर्जन होते. सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असून, Police बंदोबस्त आणि Coast Guard लक्ष ठेवून आहेत. तीस तासांपेक्षा जास्त काळ यंत्रणा काम करत आहे. तराफ्याला Digital पद्धतीने सजवले असून, विविध रंगांचे Lights लावण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने भाविक आणि गणेश भक्त उत्साहात सहभागी झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola