Ganeshotsav Vastav EP 78:गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप,तासंतास चालणाऱ्या मिरवणुका,धर्मशास्त्रात बसतं का?
Ganeshotsav Vastav EP 78:गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप,तासंतास चालणाऱ्या मिरवणुका,धर्मशास्त्रात बसतं का?
Ganesh Chaturthi 2024 Sthapna : गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे. गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथी रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानुसार, घराघरांत लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते. पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. पण, लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी याच संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गणेश चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त (Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurta)
पंचांगानुसार, गणेश चतुर्थी शनिवारी, 7 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 वाजता सुरू होईल आणि रविवार, 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:37 वाजता समाप्त होईल.
मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त : सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 पर्यंत
म्हणजेच तुम्ही 7 सप्टेंबरला 2 तास 31 मिनिटांच्या शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता.
घरात गणपतीची स्थापना करताना 'या' 10 गोष्टी लक्षात घ्या
जर तुम्ही यंदा घरी गणपतीचं आगमन करणार आहात तर तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे.
1. गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ-संध्याकाळ दिवा लावा. तसेच, बाप्पाची मनोभावे पूजा करा.
2. गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी 3 वेळा गणपतीला प्रसाद चढवा.
3. लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसांत सात्विक भोजन करा.
4. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करा. गणरायासाठी उपवास ठेवा तसेच गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका.
5. गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा. गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच त्या स्थानी रोज गंगाजल शिंपडा.
6. घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या.
7. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू शकता. पण, शेंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती घरी आणणं शुभ मानले जाते.
8. तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा. पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम. यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही.
9. घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा.
10. घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका.