Ganeshotsav 2022 : बाप्पांच्या आगमनावेळीच आलं विघ्न; सोलापूर, मंगळवेढ्यात नागरिकांमध्ये संताप

Continues below advertisement

गणरायाच्या आगमनाच्या दिवशी आज राज्यभर उत्साहाचं वातावरण आहे.. गणरायाच्या आगमनाने विघ्न दूर होतं अशी भाविकांची भावना असते पण.. सोलापूर आणि मंगळवेढा य़ेथे बाप्पाच्या आगमनातच विघ्न आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बाप्पाच्या आगमनाचा राज्यभर आनंद साजरा केला जात असताना मंगळवेढा तालुक्यातील माचपूर येथील गणेश मंदिरात पुरातत्व विभागाने तोडफोड केल्यामुळे गणेशभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली.. दुसरीकडे सोलापुरातील प्रसिद्ध मश्रुम गणपती मंदिराच्या सोन्याच्या कळसाची चोरी झालीय. ऐन गणेशोत्वासाच्या काळात ही चोरी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. बाप्पाच्या आगमनादिवशी विघ्न आणणारे हे विघ्नसंतोषी कोण? असा सवाल आता उपस्थित होतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram