Ganeshotsav 2022 : POP च्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक
abp majha web team
Updated at:
22 Jul 2022 02:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाचा गणेशोत्सवर निर्बंधमुक्त होणार आहे... त्यासोबतच हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई पालिकेनं मूर्तींबाबत वेगळी नियमावली काढलेय.. ही नियमावली प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींसाठी असेल... कोरोनामुळे विशेष बाब म्हणून यंदा मुंबई पालिका क्षेत्रात पीओपी मूर्तींना परवानगी देण्यात आलेय... मात्र या पीओपी मूर्तींचं विसर्जन करताना ते फक्त कृत्रिम तलावात करता येणार आहे.. तसंच या मूर्तींवर पीओपी असं नमूद करणंही बंधनकारक करण्यात आलंय. तसंच पीओपी मूर्तींबाबत केवळ यंदाच्या वर्षी नियम शिथील असतील मात्र पुढील वर्षापासून पीओपी मूर्तींवर बंदीच असणार आहे.