Ganeshotsav 2021 : उद्या गणेश चतुर्थी, आज कोकणात गर्दी; 4 दिवसांच्या तुलनेत आजची संख्या अधिक
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात, राज्यभरात उद्या गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे आता गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी अनेक मुंबईकर आणि राज्यभरातील कोकणी माणूस आपापल्या गावी पोहोचचोय. गेल्या 4 दिवसांच्या तुलनेत आज गावी येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं हजारो खाजगी गाड्या आणि जवळपास 75 विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावत आहेत. रत्नागिरीसह कोकणात मोठ्या संख्येनं नागरिक दाखल झाले आहेत.