Ganeshotsav 2021 : देश-विदेशातून गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ; मूर्तीकार कुणाल पाटील यांच्याशी बातचीत

रायगड जिल्ह्यातील पेण जवळचं हमरापूर हे गाव प्रत्येक वर्षी 10 ते 15 लाख गणेश मूर्ती तयार करून देशात परदेशात पाठवत असतात. मागच्या वर्षी कोरोनामुळे मूर्ती जास्त प्रमाणात विक्री झाल्या नव्हत्या. मात्र यंदा मागच्यावर्षीच्या तुलनेत ५० टक्के व्यवसाय वाढला असल्याने मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केलं आहे. यंदा फेटा घातलेल्या गणेश मूर्ती आणि हातात बासरी असणाऱ्या गणेशमुर्तींना जास्त मागणी असल्याची माहिती मूर्तिकार कुणाल पाटील यांनी दिलीय.यंदा प्रशासनाकडून पीओपी बाबतच्या गाईडलाईन्स उशिरा आल्याने मूर्ती बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही असं देखील मूर्तिकारांचं म्हणणं आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मालिका आणि सिनेमावर आधारित मूर्ती केल्या जातात उदाहरणार्थ जय मल्हार, बाहुबली परंतु यंदा वेळ पुरेसा मिळाला नसल्यामुळे आशा मूर्ती करू शकलो नाही अशी खंत मूर्तिकारांमध्ये आहे. परंतु तरीदेखील सर्वसामान्यांपर्यत मूर्ती पोहचवण्यासाठी कलाकार गणेशोत्सव अगदी दोन दिवसांवर आला असला तरी दिवसरात्र मेहनत करताना आपल्याला पाहिला मिळत आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola