Ganesh Visarjan | पुणे, रत्नागिरी, ठाण्यात बाप्पांना निरोप, पर्यावरणपूरक व्यवस्थेवर भर
बाप्पांना आज निरोप दिला जात आहे. ज्या उत्साहात बाप्पांचे आगमन झाले होते, त्याच उत्साहात आज त्यांना निरोप दिला जात आहे. पुणे महानगरपालिकेकडून नदीकाठी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी खास हौद तयार करण्यात आले आहेत. अनेक भाविक याच हौदात विसर्जन करत आहेत. काही भाविकांनी नदीत विसर्जन केले, तर काहींनी पर्यावरणपूरक हौदात विसर्जन केले. एका भाविकाने दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाबद्दल बोलताना सांगितले की, "पुणे महानगरपालिकेनी जी व्यवस्था केली अतिशय उत्तम केलेली आहे. त्यामुळे विसर्जनाला मला काहीच अडथळा आलेला नाहीये." तसेच, "बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत," असेही ते म्हणाले. रत्नागिरीमध्येही ढोलताशांच्या गजरात दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. मांडवी समुद्रकिनारी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. ठाण्यातही दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन पार पडले. ठाणे महानगरपालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. ठाण्यासह कळवा, मुंब्रा, दिवा आणि घोडबंदरमध्येही पर्यावरणपूरक कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन तलावांची सोय करण्यात आली आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची बातमी आहे.