Manoj Jarange Protest | Azad Maidan वर 5000 आंदोलकांची मर्यादा, पोलिसांच्या अटी
मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडून अटी घालण्यात आल्या आहेत. २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकांसह आंदोलन करता येईल का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची नियमावली हे यामागचे कारण आहे. पोलिसांनी मनोज जरांगे यांना अट घातली आहे की, "वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयांवर इतर संघटनांना आंदोलन करायचं आहे त्यांचा हक्क बाधित होता कामा नये." त्यामुळे, २९ ऑगस्टला आझाद मैदानावर ज्या संघटनांना आंदोलनाची परवानगी मिळाली आहे, त्या आंदोलकांची संख्या मनोज जरांगे यांच्या पाच हजार आंदोलकांच्या संख्येतून वगळावी लागेल. उर्वरित आंदोलकांसहच जरांगे यांना २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर आंदोलन करता येईल असे कळते. २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर किती संघटनांना आणि किती आंदोलकांना पोलिसांनी परवानगी दिली आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एका दिवसाची परवानगी मिळाली असली तरी त्यात अनेक अटी व शर्ती आहेत. आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे याविषयी अधिक माहिती देत आहेत.