Ganesh Visarjan 2021 : पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन; बाप्पाला भावपूर्ण निरोप

Continues below advertisement

मुंबई : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जात आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र, कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच करावा लागत असल्याने भक्तांचा काहीसा हिरमोड झालेला पहायला मिळाला. किमान पुढच्या वर्षीतरी अशी परिस्थिती नसावी असच मागणं यंदा बाप्पाकडे गेलं आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे. अनेकांनी कृत्रिम आणि फिरत्या तलावाला प्राधान्य दिलं.

आजच्या विसर्जनाला मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. मुंबईतील जी उत्तर विभागात पालिकेच्या वतीने 6 तलाव तयार केले आहेत. यंदा देखील कोरोनामुळे सर्वसामान्यांना कृत्रिम तलावाजवळ येऊन बाप्पाचं विसर्जन करता येणार नाही. याठिकाणी पालिकेच्या वतीने जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. एकट्या जी उत्तर विभागात ठिकठिकाणी 70 जीवरक्षक बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी उपस्थित असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही प्रकारे गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तगडा तैनात करण्यात आला आहे. प्रसिद्ध लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram