Gajanan Maharaj of Shegaon | शेगावचं गजानन महाराज मंदिर उघडण्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी
दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिलं आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरं आणि प्रार्थनस्थळं उघडण्यात येणार आहे. यात शेगावचं गजानन महाराज मंदिरही उद्यापासून खुलं होणार आहे. मात्र, आता दर्शनासाठी नवी नियमावली असणार आहे.