Gadchiroli : गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक, सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
रोमित
Updated at:
13 Nov 2021 06:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगडचिरोली : आज सकाळी पोलीस आणि नक्षल्यावाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली असून या भीषण चकमकीत पोलिसांना सहा नक्षल्यवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चकमकी दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरने तात्काळ नागपूरला हलवण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.