Gadchiroli Deforestation : महिला कर्मचाऱ्यानं 7 एकर जमीन खरेदी केली आणि 50 एकर जंगल JCB तोडलं
Continues below advertisement
गडचिरोली तालुक्यात चुरचुरा गावातील जंगलालगत असलेली थोडीशी शेती विकत घेऊन त्या लगत असलेल्या पन्नास एकर जंगलच तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गावाशेजारी वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत महिला कर्मचारी असलेल्या गायत्री फुलझेले यांनी या भागातील 7 एकर अतिक्रमण केलेली शेती विकत घेतली होती. त्या सात एकर शेतीत बारीक झुडपे असल्याने तोडण्यासाठी वन विभागाकडून परवानगी घेतली. मात्र ही परवानगी मिळाल्यानंतर स्वतःच्या जागेऐवजी वनविभाग आणि महसूल विभागाच्या जमिनीवर असलेले अंदाजे पन्नास एकर जंगल जेसीबी आणि पोकलेन मशीन लावून पूर्ण भुईसपाट केले. त्यानंतर कत्तल केलेल्या पाचशेपेक्षा झाडांची लाकडे पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच ठिकाणी जमिनीत पुरण्यात आली.
Continues below advertisement