SCHOOL : शाळा दिवाळीपूर्वी सुरू करणार की दिवाळीनंतर याचा निर्णय दोन दिवसात, बच्चू कडू यांची माहिती
Continues below advertisement
School Reopen : राज्यातील शाळा दिवाळीपूर्वी सुरु होईल की दिवाळी नंतर सुरु होईल या संदर्भातला निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल. मात्र, त्यापूर्वी राज्याचे आरोग्य विभाग आणि कोरोनाच्या संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्स सोबत चर्चा केली जाईल अशी माहिती शिक्षण राज्य मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली आहे. राज्य सरकारचा शाळा सुरु करण्याबद्दल सल्ला मसलत करअसून शाळा दिवाळीनंतर सुरू करायच्या की आत्ताच सुरू करायच्या यासंदर्भात तज्ञांसोबत चर्चा करून येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुळे राज्यात शाळांच्या घंटा पुन्हा केव्हा वाजणार या बद्दलची उत्सुकता लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
Continues below advertisement