FYJC उद्यापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार, 14 ते 22 ऑगस्ट दरम्यान अर्ज भाग-1 भरता येणार
अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालं आहे. 14 ऑगस्ट पासून ही अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 14 ते 22 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशसाठी अर्ज भाग - 1 भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी जवळच्या कॉलेज, मर्गदर्शक केंद्रावर जाऊन व्हेरिफाय करावे, 17 ऑगस्ट सकळी 10 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेजचे पसंती क्रमांक भरायचे आहेत.
Tags :
Mumbai High Court Bombay High Court 11th Admission Cet Entrance Exam FYJC FYJC Admission FYJC Entrance