Futala Lake Project | नागपूरकरांना दिलासा, फुटाळा तलाव प्रकल्पाला हिरवा कंदील!
Continues below advertisement
नागपूरच्या फुटाळा तलावाला सर्वोच्च न्यायालयाने Wetland म्हणजेच पाणथळ जमीन मानण्यास नकार दिला आहे. यामुळे नागपूर सुधार प्रन्यास (NIT) द्वारे तलावामध्ये उभारण्यात येणारे तात्पुरते स्ट्रक्चर्स, कारंजे आणि इतर विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी, फुटाळा तलाव Wetland असून 2017 च्या कायद्यानुसार अशा प्रकारची विकासकामे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करतात, असा दावा याचिकेद्वारे करण्यात आला होता. नागपूर शहराच्या पर्यटनात भर घालणारा हा म्युझिकल फाऊंटन प्रकल्प मागील तीन वर्षांपासून न्यायालयीन लढाईमुळे थांबलेला होता. काही पर्यावरणवादी संस्थांनी या प्रकल्पाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती, त्यांचे म्हणणे होते की यामुळे 2017 च्या पर्यावरण सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत आहे. नागपूर खंडपीठाने या बांधकामावर बंदी घातली होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पाला दिलासा दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की फुटाळा तलाव Wetland नाही आणि या बांधकामामुळे पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन होत नाही. सध्या प्रकल्पाचे नुकसान झाले असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नागपूरकर या प्रकल्पाच्या सुरु होण्याची वाट पाहत होते आणि न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना आनंद झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement