Petrol Diesel : Fuel Rates कपातीच्या मुद्द्यावरून सामना, महाराष्ट्र सरकारही करकपात करणार?
Continues below advertisement
Petrol Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्रातील मोदी सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच अनेक भाजपशासित राज्यांनी तेलावरील व्हॅटही कमी केला आहे. त्याचवेळी राज्यांमध्ये व्हॅट कमी न केल्याबद्दल भाजपने विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केले आहे.
Continues below advertisement