Buldhana : उद्धव ठाकरेंवर टिका करताना शिवसेनेचे माजी नेते बलदेवराव चोपडेंची जीभे घसरली...

राजकीय नेते सार्वजनिक जीवनात आपली भाषा कधी सुधारणार? असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण शिवसेनेचे माजी बुलढाणा जिल्हाप्रमुख आणि आताच भाजपवासी बलदेवराव चोपडे यांनी अत्यंत खालच्या भाषेत शिवसेना पक्षावर टीका केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलतानाही चोपडेंचा जीभेवरचा ताबा सुटला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजपा किसान आघाडीतर्फे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली काल मलकापूर येथे आसूड मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola