Mumbai Crime: मुंबईत शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेवर जीवघेणा हल्ला, नाजिया सोफी यांच्यावर हल्ला
Continues below advertisement
मुंबईच्या जोगेश्वरी (Jogeshwari) मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका नाजिया सोफी (Nazia Sofi) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. 'अज्ञात इसमानं हा हल्ला केल्याची माहिती' समोर येत आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक ७८ च्या माजी नगरसेविका, नाजिया सोफी, आपल्या पतीसोबत प्रभागातल्या कामाची पाहणी करत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी जोगेश्वरी येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला कोणी व कोणत्या कारणास्तव केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच मेघवाडी पोलीस (Meghwadi Police) घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासकार्य सुरू केले आहे. या घटनेमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement