Beed Factory Sale: 'वैद्यनाथ कारखाना विक्री, शेतकऱ्यांच्या ठेवींचं काय?

Continues below advertisement
बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीवरून (Vaidyanath Sahkari Sakhar Karkhana Sale) नवा वाद पेटला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे (Krantikari Shetkari Sanghatana) पदाधिकारी कुलदीप करपे (Kuldeep Karpe) यांनी या विक्रीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कुलदीप करपे यांनी सवाल केला की, 'ऊस उत्पादकांच्या शेअर्सच्या ठेवलेल्या ठेवीचं काय?'. हा कारखाना ७५०० संस्थापक सभासदांचा असून, त्यांना विश्वासात न घेता केवळ १३२ कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विकण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. हा व्यवहार म्हणजे बँकांची कर्ज बुडवण्याचा प्रकार असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या विरोधात संघटना उच्च न्यायालयात धाव घेणार असून, कारवाई न झाल्यास दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola