Anil Deshmukh : 100 कोटी वसुली प्रकरणी आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख चौकशीसाठी चांदीवाल आयोगा समोर
Continues below advertisement
सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यानंतर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज चांदीवाल आयोगासमोर हजर राहणार आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर केलेत. या प्रकरणाचा तपास चांदीवाल आयोग करत आहे. या प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी अनिल देशमुख यांना आयोगानं समन्स बजावलंय. सकाळी साडेअकराच्या सुमारास देशमुख आयोगासमोर हजर राहणार आहेत. दरम्यान काल परमबीर सिंह आणि सचिन वाझे चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी हे दोघं समोरासमोर आले आणि या दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेची मुंबई पोलिसांकडून चौकशी होणार आहे. अनिल देशमुखांच्या वकिलांनीही या भेटीवर आक्षेप नोंदवलाय.
Continues below advertisement