Ahmednagar : भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरण भरल्याने प्रवरा नदीला पूर
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले असून निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात 20 हजार क्यूसेक वेगानं विसर्ग सोडण्यात आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय... गेल्या काही दिवसापासून दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून दोन्ही धरण भरल्यानंतर काल संध्याकाळ पासून प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात आलाय.. काल रात्री 30 हजार क्यूसेक वेगानं सुरू असणारा विसर्ग सकाळी 20 हजार क्यूसेक वर आला असून प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे.. प्रवरा नदी पात्रालागत असणाऱ्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित केले असून नदीवर असणारे छोटे पूल वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे..
Continues below advertisement