Maharashtra Flood : पूरबाधित व्यावसायिकांना दिलासा, जिल्हा सहकारी बँकांतून 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध
पूरग्रस्त भागातील व्यावसायीकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील व्यवसायिकांना 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी राखत जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत काल (बुधवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.