Flood : Ratnagiri च्या माखजनमध्ये कंबरेपर्यंत पावसाचं पाणी, बाजारपेठांचं अतोनात नुकसान ABP Majha
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यात आता हळूहळू पावसाचा जोर वाढत आहे. संगमेश्वर तालुक्यात देखील पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरूवात केली असून त्यामुळे गडनदीला पूर आला आहे. परिणामी आता माखजन बाजारपेठेत पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. कळंबुशी येथे देखील पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या पुलावरून पाणी वाहू लागलं आहे. जिल्ह्यात 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Continues below advertisement