Belgaum : बेळगाव जिल्ह्यात हृदयद्रावक घटना, एकाच कुटुंबातील पाच जणांची विष प्राशन करून आत्महत्या
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील बोरगल गावातील एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वडील,तीन मुली आणि एक मुलगा अशा एकच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने बोरगल गावावर शोककळा पसरली आहे. निवृत्त जवान गोपाळ हादीमनी याची पत्नी जया हीचे दोन महिन्यापूर्वी ब्लॅक फंगसने निधन झाले होते. गोपाळ याला पत्नी निधनाचा धक्का बसला होता. तेव्हापासून गोपाळ दुःखी होता.पत्नी निधनामुळे नैराश्येतून गोपाळ याने स्वतः आणि मुलांना विष प्राशन करायला लावून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.