Sangli Accident | सांगलीत कार विहिरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू | ABP Majha
वॅगनार कारला अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना आटपाडी तालुक्यातील झरे-पारेकरवाडी रोडवर घडली आहे. वॅगनार गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन पडली. त्यामुळे कारमधील पाच जणांचा गाडीतच बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.