Pune : बेलसर गावात महाराष्ट्रातला झिकाचा पहिला रुग्ण, प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातल्या बेलसर गावात राज्यातील झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आता प्रशासन सतर्क झालंय. विविध पातळ्यांवर प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या वीर्यात झिकाचे विषाणू आढळत असल्याने गर्भधारणा टाळ्ण्यासाठी व सुरक्षित संभोग व्हावा यासाठी बेलसर गावात पुरुषांना निरोधचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने भोंगागाडीच्या माध्यमातून खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. धूर फवारणी, डास प्रतिबंधक मलम, मच्छरदाणीचं वाटप असे उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत.
Continues below advertisement