Satara Murder Story : आधी बायकोची हत्यानंतर प्रेयसीचा खून, सीरिअल किलिंगने सातारा पुन्हा हादरलं
सातारा : बायकोची हत्या केल्यानंतर नितीन गोळे यानं एका महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं. वर्षभरापासून ती महिला नितीन गोळेच्या संपर्कात होती. पण 10 दिवसांपूर्वी त्याच महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला, त्यासोबतच त्याने केलेल्या पत्नीच्या खुनाबद्दलही माहिती उघडकीस आली. त्याने आणखी काही हत्या केल्याचा संशयही पोलिसांना आहे.