First Shravan Somwar | ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, श्रावणातील पहिल्या सोमवाराचा उत्साह
श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, आज पहिला श्रावणी सोमवार आहे. पुण्यामधील ओंकारेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. हे मंदिर २८८ वर्षे जुने असून, पेशवेकालीन आहे. संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणातून बांधण्यात आले आहे. मुळामुठा नदीच्या तीरावर वसलेले हे मंदिर पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात मोठे उत्सव साजरे केले जातात. दिवसभर लघुरुद्र आणि अभिषेक करण्यात येत आहे. सकाळपासून महापूजा आणि अभिषेक सुरू आहेत. शिवलिंगाची पिंड उत्तम प्रकारे सजवण्यात आली आहे. आरत्या आणि व्रतवैकल्याच्या काळात पूजा-अर्चा केली जाते. मोठ्या पावसामुळे हे मंदिर काही प्रमाणात पाण्यात गेल्याचेही पाहायला मिळते. श्रावण महिना नेहमीप्रमाणेच चालू असतो. श्रावणातील चार सोमवारी सकाळी पाच वाजता लघुरुद्र सुरू झाले असून, अभिषेक दिवसभर चालू राहणार आहेत. दुपारनंतर सजावट होईल. पावसामुळे थोडी गर्दी कमी असली तरी भाविकांची उपस्थिती आहे. दर्शनासाठी संपूर्ण श्रावण महिना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आज पहिला सोमवार असल्याने पुणेकर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.