BJP Meeting | वर्धा मंथन बैठकीला Sudhir Mungantiwar गैरहजर, नाराजीच्या चर्चांना उधाण
वर्ध्याच्या सेवाग्राम येथे आज भारतीय जनता पक्षाची विभागीय मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते Sudhir Mungantiwar अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. वैयक्तिक कार्यक्रम आणि पूर्वनियोजित कामांमुळे ते राज्याबाहेर असल्याने उपस्थित राहणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे वक्तव्य धारदार होते आणि पक्षाला व सरकारला कुठेतरी चिंतेत पाडणारे किंवा कात्रीत पकडणारे होते, असे प्रतिनिधींनी सांगितले. त्यामुळे विदर्भातील पक्ष संघटनेसंदर्भात होणाऱ्या मंथनमध्ये ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही बैठक पक्षाच्या पातळीवर खूप आधीच ठरलेली होती. मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. मुनगंटीवार यांच्या अनुपस्थितीमुळे ते नाराज आहेत का, या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाल्याचे दिसत आहे. एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी या संदर्भात अधिक माहिती दिली.