Nagpur Fire: फटाक्यांमुळे नागपुरात एका रात्रीत 6 ठिकाणी आग, Reliance Smart Store जळून खाक!
Continues below advertisement
नागपूर (Nagpur) शहरात फटाक्यांमुळे (Firecrackers) झालेल्या अग्नितांडवात मोठे नुकसान झाले आहे. शहरातील आठ रस्ता चौकातील (Aath Rasta Chowk) रिलायन्स स्मार्ट स्टोअरला (Reliance Smart Store) लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण स्टोअर जळून खाक झाले. आगीच्या घटनेत स्टोअरमधील सर्व साहित्य जळून लाखों रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या मोठ्या आगीव्यतिरिक्त, शहराच्या इतर पाच वेगवेगळ्या भागांमध्येही फटाक्यांमुळे आगी लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement