Pooja Chavan Death Case | शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा; पूजाच्या आई-वडिलांची मागणी

Continues below advertisement
बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. हा आरोप बदनामीकारक आणि बेछुट आहे. हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पूजाच्या वडिलांनी आता परळी पोलिसांकडे धाव‌ घेतली आहे. आज त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमच्यावर आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत पूजाचे वडील लहु चव्हाण यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram